Posts

Showing posts from July, 2019

त्या वळणावर - भाग 6

Image
त्या वळणावर भाग #6 "धनंजय इतका मुरलेला असेल वाटलं नव्हतं...फारच सफाईदारपणे त्याने हे काम केलं होतं...राजेशला ह्याचा थांगपत्ता लागला नाही...आधी त्यांनी राजेशला खुप मारलं...ड्युटी संपल्यावर मारल्यामुळे आम्ही कोणीही नव्हतो..रात्रीच्या पोलिसांना नक्की काय चाललयं ह्याची कल्पना नव्हती...काहीतरी असेल समजुन त्यांनी मारु दिलं...जबरदस्त मार खाल्यामुळे राजेश खचुन गेला...गप्प पडुन होता.." हे सगळं सांगताना तिला होणारा त्रास तिच्या चेहरयावर दिसत होता.अभिषेकने तिला डोळ्यांनीच मी आहे ना असे खुणावले.तिने मान हलवली. "खरं सांगु का मुक्ता...कितीही त्रासदायक वाटत असलं तरी बोलण महत्वाचं आहे...एकदा बोलुन टाकं..."तो म्हणाला. तिने दिर्घ श्वास सोडला.समोर असलेला पाण्याचा घोट घेऊन तिने विचारले,"तुम्हाला वाटतयं का मी बोलल्याने हे संपेल??..." तो जरासा चाचपडला,"म्हणजे तु अशी किती दिवस गप्प रहाणार म्हणुन म्हणत आहे...काही तरी अंदाज तर करता येईल ना..." असे म्हणत त्याने भुवया उडवत खरं की नाही विचारलं.ती काहीच बोलली नाही.म्हणुन त्याने पुन्हा विचारले,"खरं की नाही?? सा...

त्या वळणावर - भाग 8

Image
त्या वळणावर भाग #8 मुक्ताच्या डोळ्यातले भाव बरंच काही सांगत असले तरी तिला मनातुन कसं वाटतं असेल ह्याची त्याला कल्पना येत होती.नक्की अजुन काही तरी आहे ह्याही पलिकडे हे त्याला माहिती होते.पण तिला ताण न येता हे सगळं बोलणं गरजेचं होतं आणि ती खुपच मनापासुन बोलतं होती हे तिच्या वागण्या बोलण्यातुन कळतं होते. मुक्ता बोलु लागली,"मी प्रयत्नात होते की धनंजयचे खरे रुप जगासमोर दाखवुन द्यायचे म्हणुन पण तो तर मलाच ह्यात अडकवतं चालला होता.खुप प्रयत्न करत मी रानडे साहेबांशी एकट्यात गाठ घेऊन आत्तापर्यंतचे सगळे सांगितले.माझा आधीचा रेकाँर्ड पहाता त्यांना माहिती होते की मी जे सांगतेय ते खरं आहे पण त्यांचेही म्हणणे ठरले की सध्या माझ्याविरुध्द जास्त पुरावे जमा होत आहेत.त्यामुळे जरा सावधतेने घे.काहीही करुन तु त्याच्याविरुध्द पुरावे दाखव,लगेच त्याच्यावर कारवाई सुरु करण्यात येईल. हे सगळे ऐकुन मीही न कळु देता पुरावे गोळा करु लागले.त्याची कुणकुण कशी काय धनंजयला लागली काय माहिती....त्याने मला सरळ धमकी दिली,"जगणं मुश्किल होईल हा...नसत्याठिकाणी नाकं खुपसु नका.. " मी दुर्लक्ष केले.म्हणुन की क...

त्या वळणावर - भाग 7

Image
त्या वळणावर भाग #7 मुक्ता काय सांगणार ह्याचा अंदाज बांधायचा अभिषेकने प्रयत्न केला नाही.त्यापेक्षा हे बोलताना,मनातले सांगताना तिच्यात होणारे बदल व तिच्या चेहरयावरचे हावभाव तो टिपत होता.एक धडाडीची अधिकारी तिच्या बोलण्यातुन जाणवत होती. अभिषेकने काहीही न बोलता डोळ्यांनीच सांग म्हणुन खुणावलं. ती बोलु लागली," धनंजयने पत्रकार परिषद बोलावली होती.मिडियावाले हजर झाले.मोठ्या व्यक्तीला वाचवण्यासाठीचा हा सगळा प्रयत्न सुरु होता.सगळ्यांच्या देखत हा कबुली जबाब दाखवला जाणार होता.मी खुप काँल केले पण कानडे सर भेटलेच नाहित.म्हणुन मी त्यांचे आँफिस गाठले.तिथे त्यांच्या हाताखालच्या आँफिसरला विश्वासात घेऊन मी हे काम किती तातडीचे आहे सांगितले.त्याने सरांना काँल लावुन ह्याची कल्पना दिली.ते ताबडतोब येतो म्हणाले.रानडे सर पत्रकार असताना गेले नाहित तर मिडियावर काहीच येऊ शकत नाही हे मला माहिती होते.त्यामुळे ते तिथे जाण्यापुर्वी सगळं सांगण गरजेचे होते.पण इथेही धनंजयला माहिती पुरवणारा कोण माणुस होता देव जाणे.मी इथे आलीये हे त्याच्यापर्यंत कळले.ते पाहुन ह्या प्रकरणात गुंतागुंत वाढावी म्हणुन धनंजयने कापडेचा...

त्या वळणावर - भाग 5

Image
त्या वळणावर भाग #5 "तो रागात निघुन गेला पण मी अजिबात घाबरले नव्हते...असे छप्पन पाहिलेत अश्या अभिर्भावात मी पुढे कामाला लागले...पण तो माझ्या बोलण्यावर लक्ष ठेवुन होता...धनंजय हा पोलिस खात्याच्या नावाला मोठा कलंक होता हे मला कळत होत.फक्त सिध्द करायचं बाकी होतं...."मुक्ता सांगत होती.पण तिच्या डोळ्यासमोर सगळा प्रसंग येतोय असे तिच्या चेहरयावरील हावभावांवरुन दिसत होते. तेवढ्यात डाँ.अभिषेकचा फोन वाजला. "साँरी एक मिनिट..."म्हणत त्याने काँल उचलला. मुक्ता पण तोपर्यंत तिचा फोन बघत होती.काहीतरी वाचले आणि तिचा चेहरा पडला.तिने ,"चला,पुन्हा भेटुयात..."असे त्याला म्हणले. "मी तुला पुन्हा बोलतो..."म्हणत त्याने फोन बंद केला व तिला विचारले,"काही प्राँब्लेम..??" तिने नाही अशी मान हलवली व ती बाहेर निघाली.अभिषेकने तिला विचारले,"मुक्ता...तु कशी आली आहेस??...मी सोडु का??..." तिने क्षणभर विचार केला.बहुदा टँक्सीनेच अाली असावी ती... तिने विचार करुन नको म्हणलं.अभिषेकने खांदे उडवत नो प्राँब्लेम म्हणत टँक्सीला हात केला.ती बसली व टँक्सी निघाली....

त्या वळणावर- भाग 4

Image
त्या वळणावर भाग #4 "नाही...नाशिकच्या वास्तव्यात तर अजिबातच वेळ मिळाला नाही कोणाशी मैत्री करायचा...आणि तसा कोणी जोडीदारही...त्यामुळे कोणाशी मैत्री करायची वेळच आली नाही..." मुक्ताचे हे बोलणे एेकुन तो फक्त हसला.तो तिच्या हालचालींवर लक्ष देऊन होता.काँफीच्या कपची कडा पुसत तिने काँफीचा एक सीप घेतला.तिला जरा तरतरी वाटली.कप टेबलवर ठेवुन ती त्याच्याकडे पहात म्हणाली,"तुमची काही वेगळी अपेक्षा होती का?.." तिच्या ह्या अनपेक्षित प्रश्नाने तो क्षणभर दचकला.तिच्याकडे पहात तो म्हणाला,"नाही...तसे नाही...पण अंदाज घेत होतो...आणि तुझ्याविषयी काहीच माहिती नसल्यामुळे अंदाज येत नाहियेत..." ती हसली व हातातला कप गोल फिरवत त्याच्या म्हणाली,"विशेष आहे...माझी मैत्रिण रागिणी आणि आमचे हवालदार माने ह्यांनी काहीच सांगितलं नाही का?.." हे ऐकुन मात्र अभिषेक उडालाच.तिच्या नजरेला नजर न देता  तो जागेवरुन उठला व खुर्चीवर हात ठेवुन म्हणाला,"विशेष आहे...तुला माहिती आहे ते भेटुन गेले ते...तु माझ्या पण मागावर आहेस म्हणजे...तुझ्या मनात चाललयं तरी काय..." ती काही क्षण ...

त्या वळणावर - भाग 3

Image
त्या वळणावर भाग #3 दुसरयादिवशी मुक्ताला बोलावुन घ्यावे असा विचार केला पण अभिषेकला आठवलं की दोन दिवस काँन्फरन्स असल्यामुळे आपण काही करु शकत नाही.मग त्याने तो विषय सोडुन दोन दिवसात काँन्फरन्समधे येणारया विविध डाँक्टर्स बरोबर काय काय चर्चा करायची हे डायरीत नोंद करुन ठेवले. त्याचेही एक पेपर प्रेझेंटेशन असल्यामुळे त्याची उजळणी केली.सकाळी वेळ मिळणार नाही म्हणुन रात्रीच त्याची तयारी सुरु होती.तेवढ्यात फोन वाजला...इतक्या उशीरा कोण आहे म्हणुन बघितले तर डाँ.दिवाणांचा फोन होता. त्याने फोन उचलला तर डाँ.बोलु लागले,"साँरी टु काँल यु लेट नाईट...पण एक गोष्ट सांगायला फोन केला...इन.मुक्ताचा मला काँल होता,तुझा नंबर मागण्यासाठी...म्हणे मला काही बोलायचं आहे डाँक्टरांशी...तर मी तुझा नंबर दिलाय...बघ काय सांगायचंय तिला ते..." "नो प्रोब्लेम सर...तुमच्या रेफरन्सने आलेली केस आहे ही...नक्कीच साँभाळुन घेईन मी..."तो म्हणाला.,"पण एक विचारु का सर??ह्या केसमधे तुम्ही पर्सनली कसे काय गुंतले आहात?? एनी स्पेसिफिक रिझन??.." "हो...ती काय सांगते हे तिच्या सिनियर्सना जाणुन घ्याय...

त्या वळणावर - भाग 2

Image
त्या_वळणावर भाग #2 "अभिषेक...केस जरा वेगळी आहे म्हणुनच तर तुझ्याकडे पाठवली आहे...मला विश्वास आहे की तुच तिला ह्यातुन बाहेर काढु शकशील..."डाँ.दिवाण बोलत होते पण अभिषेक विचारात पडला होता. तेवढ्यात ते पुढे बोलु लागले,"थोडक्यात सांगतो,सध्या ती पोलिस इन्स्पेक्टर पदावर आहे.खुपच जिद्दीने,मेहेनतीने ती ह्या पदापर्यंत लहान वयातच पोहोचली.बरयाचश्या केसेस तिने सफाईदारपणे हाताळल्यात.पण अचानक काय झाले कळलं नाही ती मुकी असल्याप्रमाणे वावरतं आहे.कसला तरी जबरदस्त धक्का तिला बसला असावा असा एक अंदाज आहे.पण तिला दु:ख शेअर करायच नाहिये...तिच्या हाताखालच्या,आसपासच्या सगळ्यांना विचारुन झालयं,पण कोणालाही काही माहिती नाही हे विशेष...असं अचानक जबरदस्त काहीतरी घडलं असावं,पण ते तिलाच माहिती...त्यामुळे तुझ्याकडे पाठवलंय... बघ काही बोलतीये का?..." अभिषेकचा काहीच रिप्लाय येत नाहिये पाहुन डाँ.दिवाणांनी त्याला विचारले,"ऐकतो आहेस ना?...कसल्या विचारात पडला आहेस?.." "नाही तसं काही नाही...पण विचार करण्यासारखंच आहे हे सगळं...चला...बघुयात काय करु शकतो मी ह्या केस मधे ते...काही प्...

त्या वळणावर - भाग #1

Image
त्या वळणावर भाग #1 "चुप...."म्हणत जोरदार थोबाडीत मारल्याचा आवाज आला आणि कुठुन आवाज आला कळले नाही पण सर्वत्र एकदम शांतता पसरली. "तु मरणार नाहियेस...असं मरायचचं होत तर कशाला जन्म घ्यायचा,त्या आईला वेदना द्यायच्या...आपल्याला वाटलं तर जगायचं आणि वाटलं तर मरायचं...हे काय आयुष्य आहे...आत्महत्या करणारे भ्याड असतात...भ्याड... अरे,हिमतीने जगुन दाखवा मग मानलं...परिस्थितीपुढे इतकं लाचार व्हायचं आणि तेही एका पोलिस इन्स्पेक्टरने...शी...थु...." तो तिच्या खांद्याला पकडुन तावातावात बोलत होता.जोरदार थप्पड बसल्यामुळे जणु ती भानावर आली होती.तेवढ्यात आजुबाजुला गर्दी जमु लागली.आपण बीचवर आहोत ह्याचे त्याला भान आले. "चल...निघुयात..."असे म्हणत तिला जवळ घेऊन तो गर्दीतुन वाट काढत कार पार्किंगच्या दिशेने चालु लागला.सगळेजण आपल्याकडे पहात आहेत ह्याचे त्याला काहीच वाटत नव्हते.त्याने रिमोटने कारचे लाँक उघडले व तिला समोर बसवुन तो ड्राईव्हिंग सिटवर येऊन बसला.ती अजुनही जणु शुन्यात होती.त्याने गरर्कन गाडी रिव्हर्स घेतली व तो हाँटेलच्या दिशेने निघाला. हाँटेलवर येईपर्यंत दोघेही एकदम...