त्या वळणावर - भाग 6

त्या वळणावर

भाग #6

"धनंजय इतका मुरलेला असेल वाटलं नव्हतं...फारच सफाईदारपणे त्याने हे काम केलं होतं...राजेशला ह्याचा थांगपत्ता लागला नाही...आधी त्यांनी राजेशला खुप मारलं...ड्युटी संपल्यावर मारल्यामुळे आम्ही कोणीही नव्हतो..रात्रीच्या पोलिसांना नक्की काय चाललयं ह्याची कल्पना नव्हती...काहीतरी असेल समजुन त्यांनी मारु दिलं...जबरदस्त मार खाल्यामुळे राजेश खचुन गेला...गप्प पडुन होता.." हे सगळं सांगताना तिला होणारा त्रास तिच्या चेहरयावर दिसत होता.अभिषेकने तिला डोळ्यांनीच मी आहे ना असे खुणावले.तिने मान हलवली.
"खरं सांगु का मुक्ता...कितीही त्रासदायक वाटत असलं तरी बोलण महत्वाचं आहे...एकदा बोलुन टाकं..."तो म्हणाला.
तिने दिर्घ श्वास सोडला.समोर असलेला पाण्याचा घोट घेऊन तिने विचारले,"तुम्हाला वाटतयं का मी बोलल्याने हे संपेल??..."
तो जरासा चाचपडला,"म्हणजे तु अशी किती दिवस गप्प रहाणार म्हणुन म्हणत आहे...काही तरी अंदाज तर करता येईल ना..." असे म्हणत त्याने भुवया उडवत खरं की नाही विचारलं.ती काहीच बोलली नाही.म्हणुन त्याने पुन्हा विचारले,"खरं की नाही?? सांग"..
त्याचा हा प्रश्न ऐकुन ती रडु लागली...
अभिषेकला हे अपेक्षितच होतं.ताणं असह्य झाल्यामुळे डोळ्यात सहाजिकच पाणी येत हे माहित होतं.तरीही तिच्या डोळ्यात पाणी पाहुन त्याला वाईट वाटलं.त्याने खिशातुन रुमाल काढुन तिला दिला.डोळे पुसताना ती खुपच भावुक दिसत होती.अश्यावेळेस खरं तर जवळ घेतलं तर समोरच्या व्यक्तीचा आत्मविश्वास वाढतो हे पुस्तकी ज्ञान माहिती असुनही काही कामाचे नाहिये हे त्याला कळतं होते.
मुक्ताने डोळे पुसले व ती म्हणे,"साँरी...मी खुपच डिस्टर्ब आहे...".
तिच्या हातावर हात ठेवत तो म्हणाला,"मी समजु शकतो...".
तिला जरा बरं वाटलं.ती बोलु लागली,"राजेशला दोन तीन दिवस मारल जात होत आणि भुरट्या चोरीची केल किती दिवस चालणार...कोणी जास्त खेचत नाही...ज्यांच्याकडे चोरीचा प्रयत्न केला होता त्यांना सांगितलं की खुपच मारलय ह्याला ,आता पुन्हा अशी हिम्मत करणार नाही...त्यामुळे त्यांनीही नाद सोडला...
मग धनंजयने त्याला म्हणले की तुला सोडवलं आहे पण तु पुन्हा असं करणार नाहिस ह्याची काय गँरन्टी आहे ? तो खुपदा म्हणत होता की मी नाही करणार नक्की. मग धनंजयने त्याला सांगितलं की तु एका पेपरवर लिहुन दे की मी कधीही करणार नाही,तरच तुला सोडु...
राजेशने लगेच होकार दिला.त्याला वाटलं की सुटका होत असेल तर काय हरकत आहे.त्याच्या घरचे खुपच गयावया करत होते.त्याला एक लहान मुलगा होता,बायकोला धनंजयच्या नजरेची भीती वाटत असे हे सगळं आठवुन त्याने पेपरवर सही दिली.
धनंजयने कागद लिहुन आणला होता.त्याआधी काहीतरी निमित्त काढुन त्यांनी राजेशला खुप मारलं.आपोआपच त्याच्यात वाचायचे त्राण राहिले नाहित.त्याला जेव्हा सही करायला बोलावले तिथे बराच स्टाफ हजर होता.पण कोणालाच काहीच शंका पण आली नाही.राजेशने काहीही न वाचता सीसीटिव्ही कँमेरयासमोर बसुन त्या कागदावर सही करुन दिली.सही झाल्यावर तो आशेने धनंजय कडे पहात होता.धनंजयने त्याला सांगितले की ,"ठिक आहे,तुमचे अप्लिकेशन पुढे पाठवतो..." असे म्हणुन त्याला पुन्हा लाँकअप मधे टाकलं.तोही काही न बोलता गेला.
दुसरयादिवशी जेव्हा आम्ही पोलिस स्टेशनला आलो तेव्हा सगळीकडे चर्चा सुरु होती की राजेश कापडे ने आपला गुन्हा कबुल केलाय.आम्हाला आश्चर्यच वाटलं कारण त्याने काही गुन्हा केलाच नव्हता हे माहिती होतं.मी लगेच धनंजयकडे गेले.
त्याला सरळ विचारलं,"मला कळेल का राजेश कापडेने कुठला गुन्हा कबुल केलाय?..."
तो जोरात हसायला लागला.त्याच ते घाणेरड हसु बघुन संताप येत होता.पण तरीही तशीच उभी राहिले.कारण कळणे जरुरी होते.
मी पुन्हा दरडावुन विचारले,"कळेल का मला?.."
माझ्या आवाजातला जोर ऐकुन त्याने जे सांगितले ते ऐकुन माझा विश्वास बसत नव्हता.
"काय असेल असं वाटतयं तुम्हाला?"तिने अभिषेकला विचारले.
अभिषेकने काय माहिती असे खांदा उडवत न बोलताच म्हणले.
"धनंजयने राजेश कापडेने लिहिलेला कागद माझ्यासमोर ठेवला व म्हणे वाचा...कापडेने बलात्कार केल्याचे कबुल केलयं...अश्या नराधमाला फाशीची शिक्षा मिळालीच पाहिजे..."
मी बघतच राहिले.हे सगळं मान्य केलेल्या कागदावर राजेश कापडेची सही होती.मला विश्वासच बसत नव्हता.
धनंजय पुढे म्हणे,"आता सगळे सिनियर्स येणार आहेत...त्यांच्यापुढे जाहिर करुन खोट्या आरोपावर अटक केलेल्या व्यक्तीला सोडवायचे आहे..."
मला तर काय ऐकतेय असं झालं होतं.कारण हे सगळं खोट होत हे माहिती होतं.पण हे सिध्द करणे गरजेचे होते.मी तशीच कापडेकडे गेले.तो खाली मान घालुन बसुन होता.मला बघुन तो जागचा उठला.
मी विचारलं,"तुम्ही तुमचा गुन्हा कबुल केलाय हे खरं आहे?"
त्याने फक्त हो अशी मान हलवली.
मी पुढे विचारलं," कुठला गुन्हा आहे माहिती आहे का?..तुम्ही बलात्कार केलाय बलात्कार..."
माझा आवाज जढला होता.माने माझ्यासोबतच होते.ते म्हणाले,"नीट ऐकलं का...तुम्ही हे कबुल केलंय का?"
राजेश कापडेच्या चेहरयावर एकदम आश्चर्य दिसलं.तो काही बोलणार त्यापुर्वी धनंजय पटकन तिथे आला.
त्याने मला जोरात ओरडुन विचारले,"तुम्ही आरोपीशी बोलुन काय करत आहात??त्याचे मतपरिवर्तन?? हा गुन्हा आहे मिस.मुक्ता...तुमच्यावर मला कारवाई करावी लागेल..."
मी खुप चिडले होते.मी त्याला न घाबरता कापडेला म्हणल,"तुम्ही बोला...काय कबुल केलंत नेमकं..."
तो काकुळतीला येऊन म्हणाला,"चोरीचा प्रयत्न केला हो...बलात्कार नाही...नाही हो...मी असा नाहिये...मँडम वाचवा मला.."
धनंजयला राग येत होता.तो जोरात ओरडला,"इन.मुक्ता...तुम्ही पैसे खाऊन आरोपीला फुसलावत आहात का? चालणार नाही...सिनियर्स येईपर्यंत तुम्ही इथे येणार नाहित..."
मी जोरात म्हणाले," कोणी पैसे घेतले व काय केले हे पुढे कळेलच...बघुयात...तुमच्या आरोपाची गरज नाहिये..." व तडक मी पोलिस निरिक्षक कानडे सरांकडे निघाले.आधी काँल करुन सर आहेत का बघितले तर नेमके सर काही तरी महत्वाच्या कामासाठी गेलेत कळलं.तो पर्यंत मी सगळा विचार करुन माहिती गोळा करायला सुरुवात केली...."हे सांगुन ती थांबली.तिने दिर्घ श्वास घेतला.
आज तिच्या मनातला बराचसा साठलेला त्रासदायक अनुभव बाहेर निघत होता.त्यामुळे तिच्या मनावर प्रचंड तणाव आलेला दिसतच होता.तिने क्षणभर डोळे मिटले.मी हळुच तिचा हात हातात घेतला व थोपटल्यासारखं केलं.तिच्या डोळ्यातुन पुन्हा धारा वाहु लागल्या.मला वाईट वाटलं तरी मी तिचा डाँक्टर होतो म्हणुन तिच्या भल्यासाठी मला तिला बोलतं करण गरजेचंच होतं.मी तिचा चेहरा वर केला व तिच्या डोळ्यात पहात म्हणलं," मी आहे ना...रडुन घे आत्ता पण तुला असं रडत जगायचं नाहिये पुढे...तु जे केलंस ते एकदम योग्य केलं आहेस..."
तिने लगेच विचारले,"हो की नाही हो?..."
त्याने डोळ्यांनीच होकार दिला.
"पण काहीच उपयोग नाहिये खरं व योग्य जगण्याचा ह्या जगात...हे मला कळुन चुकलंय...तुम्हाला माहिती आहे पुढे काय झालं...जे झालं ते खुपच भयानक आहे...मला आठवणही काढायला नको वाटतं...पण तुम्हाला सांगावंच लागेल..."असे म्हणत ती पुढे सांगु लागली....

- क्रमश:

© प्राजक्ता रुद्रवार





Comments

Popular posts from this blog

त्या वळणावर - भाग 8

त्या वळणावर - भाग #1