त्या वळणावर - भाग 9
त्या वळणावर भाग #9 मुक्ता स्वत:शीच हसत आहे हे पाहुन डाँ.अभिषेकला जरा आश्चर्य वाटलं.त्याला त्याच्या प्रश्नाचे उत्तर हवे होते.पण अभिषेकने घड्याळात पाहिले तर चार वाजत आले होते.नेमके आज त्याला एका महत्वाच्या मिटिंगसाठी हजर रहाणे गरजेचे होते.अभिषेक हा विचार करतच होता तेवढ्यात त्याला काँल आला.त्यामुळे तो मुक्ताला म्हणाला,"खरंतर आज आपण एका अश्या वळणावर येऊन उभे आहोत की मला तुझ्या माझ्याविषयीच्या भावना जाणुन घ्यायच्या आहेत पण मला निघावं लागेल.कारण माझी एक अत्यंत महत्वाची मिटिंग आहे.उद्या नक्की भेटुयात...चालेल...?" हे ऐकुन मुक्ताने हो म्हणत मान हलवली.तिच्या मनातले वादळ बरयापैकी शमले होते.मनातलं सगळं सांगितलं म्हणुन आता तिला खुपच हलकं वाटत होतं.पण मनाला शांती वाटत नव्हती.तिला अजुन बरंच काही बोलावसं वाटत होत पण अभिषेकला घाई असल्यामुळे ती गप्प होती.अभिषेकचा प्रश्न बरोबर होता,त्याला उत्तर अपेक्षित होते.तिच्या मनात हे विचारचक्र सुरु होते.तिच्या चेहरयावरचे बदलते भाव बघुन अभिषेकने लगेच विचारले,"काही प्राँब्लेम आहे का? थोडावेळ बोलुयात का? हवे तर मी मिटिंग रद्द करु शकतो..." ती...