त्या वळणावर - भाग 8
त्या वळणावर
भाग #8
मुक्ताच्या डोळ्यातले भाव बरंच काही सांगत असले तरी तिला मनातुन कसं वाटतं असेल ह्याची त्याला कल्पना येत होती.नक्की अजुन काही तरी आहे ह्याही पलिकडे हे त्याला माहिती होते.पण तिला ताण न येता हे सगळं बोलणं गरजेचं होतं आणि ती खुपच मनापासुन बोलतं होती हे तिच्या वागण्या बोलण्यातुन कळतं होते.
मुक्ता बोलु लागली,"मी प्रयत्नात होते की धनंजयचे खरे रुप जगासमोर दाखवुन द्यायचे म्हणुन पण तो तर मलाच ह्यात अडकवतं चालला होता.खुप प्रयत्न करत मी रानडे साहेबांशी एकट्यात गाठ घेऊन आत्तापर्यंतचे सगळे सांगितले.माझा आधीचा रेकाँर्ड पहाता त्यांना माहिती होते की मी जे सांगतेय ते खरं आहे पण त्यांचेही म्हणणे ठरले की सध्या माझ्याविरुध्द जास्त पुरावे जमा होत आहेत.त्यामुळे जरा सावधतेने घे.काहीही करुन तु त्याच्याविरुध्द पुरावे दाखव,लगेच त्याच्यावर कारवाई सुरु करण्यात येईल.
हे सगळे ऐकुन मीही न कळु देता पुरावे गोळा करु लागले.त्याची कुणकुण कशी काय धनंजयला लागली काय माहिती....त्याने मला सरळ धमकी दिली,"जगणं मुश्किल होईल हा...नसत्याठिकाणी नाकं खुपसु नका.. "
मी दुर्लक्ष केले.म्हणुन की काय, राजेश कापडेला दिशाभुल करुन त्याला फितवु नये हे कारण सांगुन मला त्याच्याशी भेटायची बंदी करण्यात आली.मी अतिशय टेंशन मधे होते.
तरीही मी प्रयत्न करतच होते.
एके दिवशी अचानक संधी साधुन आली.कैद्यांच्या साठी समुपदेशनाच सेशन ठेवलं होतं.तेव्हा माझ्या हाताखाली केस सुरु असलेले काही आरोपी पण होते.सगळ्यांना एकत्र बसवले होते.कापडे पण आला होता.मी त्याच्याकडे पाहुन खुणावले.त्याला करंगळीने खुणावत बाथरुमकडे बोलावलं आणि विशेष म्हणजे तो आलाही.मी जेन्ट्स बाथरुमच्या मागच्या बाजुला कोणाला कळणार नाही अशी उभी राहिले व तो आला आहे हे चेक करुन हळुच त्याला विचारलं,"सांग...तु कसा काय कबुल केलास हा गुन्हा?? लवकर बोल..."
त्याने हळुच सांगितलं,"मला म्हणाले की मी आयुष्यात पुन्हा चोरी करणार नाही असे लिहुन दे...मी हो म्हणालो...पण सही करण्यापुर्वी मी वाचले नाही,त्यांनी सही ह्या कागदावर घेतली...रात्री त्यांनी मला हे सांगितलं तसा मी खुप चिडलो पण त्यावेळी तो म्हणाला की माझ्या बायकोशी ह्यावर चर्चा करावी लागेल...त्याच्या त्या बोलण्याचा अर्थ मला कळाला...तो किती निच पातळीवर उतरु शकतो मला माहिती आहे...म्हणुन मी तयार झालो व बायकोला सांगितले की तु हे गाव सोडुन आईकडे जा..."हे सांगताना तो रडत होता.
तेवढ्यात तिथे बुटांचा आवाज आला म्हणुन मी सटकले.त्याचे सगळे बोलणे मी रेकाँर्ड केले होते.महत्वाचा पुरावा मिळाला ह्याचा मला आनंद होत होता.मी सेशनमधे येऊन बसले.धनंजय नसला तरी कोण त्याला माहिती पुरवतं हे माहिती नव्हतं म्हणुन रिस्क न घेता हळुच येऊन बसले होते.
थोड्या वेळात मी रानडे सरांचे आँफिसमधे गेले.नशीबाने सर आँफिसमधेच होते.मी त्यांना जेव्हा ती रेकाँर्डिंग ऐकवली ते पण शाँक झाले.पण त्याला रितसर अडकवणे गरजेचे होते.ही केस सीबीआय कडे देऊन पुराव्यानिशी त्याला पकडावे असे सरांचे मत ठरले.मी पण त्याला होकार दिला.कारण आता कुठलीही चुक होता कामा नये हेच मला कळतं होतं.
मी सरांच्या आँफिसमधुन बाहेर पडले.माझ्या केबिनमधे बसुन मी काहीच झाले नाही असे भासवत होते.अचानक मला आठवण आली की माझा फोन बघितला नाही मी किती वेळापासुन म्हणुन खिशात हात घातला तर मोबाईल नाही.ड्राईव्हरला आवाज देऊन गाडीत राहिला का विचारले तर तिथे पण नव्हता.मग मात्र मी एकदम घाबरले.मानेना आवाज दिला व विचारले की तुम्ही पाहिलात का? ते नाही म्हणाले.त्यांच्या मोबाईलवरुन रिंग दिली तर बंद आहे असे येत होते.असा गेला कुठे म्हणुन विचार केला तेव्हा आठवलं की मी रानडे सरांशी बोलुन पोलिस स्टेशनच्या बाहेर पडताना एका बुरखावाल्या बाईशी टक्कर झाली होती.ती पटकन साँरी म्हणाली पण मी माझ्याच नादात असल्यामुळे जास्त लक्ष न देता ओके असे हातांनीच खुणावतं बाहेर पडले होते.तिने जाणुनबुजुन टक्कर तर दिली नसावी अशी मला शंका आली.ती जर खरी ठरली म्हणजे माझ्या प्रत्येक कामावर त्याची नजर अाहे हे स्पष्ट होते.
मी रानडे सरांच्या पोलिस स्टेशनला फोन लावुन आत्ता तासापुर्वी बुरखा घालुन आलेल्या महिलेचे काय काम होते म्हणुन चौकशी केली.त्यांनी बुरखावाल्या बाईची केस कोणी घेतली रे असे विचारले.तिकडुन हवालदाराने मीच होतो म्हणत फोन घेतला.मी त्याला विचारता तो वैतागुन म्हणे,"अहो मँडम...टाईमपास करायची जागा वाटते की काय ह्या लोकांना पोलिस स्टेशन माहिती नाही..."
मी विचारले,"का बरं..काय झालं..?"
तिकडुन हवालदार उत्तरला,"अहो मँडम,ती बाई विचारत होती की नवरयाच्या जाचाला कंटाळुन गेले आहे,तुम्ही त्याला माझे नाव न सांगता पोलिस स्टेशनला बोलावुन मारता का? मी असे शक्य नाही म्हणालो तर राहु देत म्हणुन निघुन गेली...हा काही प्रश्न झाला का...इतकं तर सगळ्यांनाच माहिती असतं...विनाकारण टाईमपास करतात..."
हे ऐकुन माझा संशय खरा ठरला.मी त्याला विचारलं की माझा मोबाईल तिथे राहिलाय का चौकशी करुन सांगा.मला शंका होतीच की माझ्या त्या रेकाँर्डिंगचा नक्कीच पत्ता लागलाय आणि ती डिलिट करायचा विचार दिसतोय.म्हणजे आपल्या पोलिस स्टेशनच अजुनही कोणीतरी सामील आहे.थोड्याच वेळात फोन आला की तुमचा फोन बाहेर पडलेला सापडलाय.
मी लगेच तिकडे गेले.मोबाईल आँन केला तर त्यातुन ती रेकाँर्डिंग डिलिट केलेली होती.म्हणजे किती सराईत गुन्हेगार झालाय तो हे दिसुन येत होते.
मी लगेच रानडे सरांना रिपोर्टिंग केलं.त्यांनी सीबीआय कडे हे प्रकरण पाठवलं व मला गप्प रहा असं सांगितलं.फक्त काही मदत लागली तर त्यांना द्यायची ऐवढंच कर आता असं सांगितलं.हो म्हणत मी बाहेर पडले पण माझा सगळीकडचा विश्वास कमी कमी होतं चालला होता.एका पोलिस अधिकारयाला असा वेळ लागत असेल एखादया केस मधे तर सामान्य नागरिकांचे काय हा विचार करुन गप्प होते...." इतके बोलुन तिने लांब श्वास सोडला.
डाँ.अभिषेकला काय बोलावं हे कळत नव्हतं.तिने सांगितलेलं खरंच खुपच भयानक होतं.तिने तर हे भोगलं होतं म्हणजे तिला किती त्रास झाला असेल ह्याची त्याला जाणीव झाली.
काही वेळ दोघेही गप्प होते.
"माझ्या मोबाईलमधली रेकाँर्डिंग गायब झाली ह्या धक्क्यातुन बाहेर येण्याच्या पुर्वीच दुसरया दिवशी सकाळी धक्कादायक बातमी कळली....राजेश कापडेने आत्महत्या केली...अतिशय धक्कादायक होतं हे सगळं माझ्यासाठी.मी तातडीने पोलिस स्टेशनला गेले.तिथे मिडियावाल्यांनी कब्जा केला होता.कापडेची बाँडी पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आली होती.पण त्याचा काहीही उपयोग नव्हता हे मला कळलं होतं.धनंजय निर्लज्जपणे फिरत होता.राजेश कापडेच्या तरुण बायको व लहान मुलाला रडताना पाहुन खुप भरुन आलं.
पण मी हिंमत न हारता सीबीआयला काही पुढचे धागे मिळालेत का हे विचारायचा प्रयत्न केला तर अजुन काहीच कळाले नाहिये असा निरोप मिळाला.मी खुपच गोंधळ घातला.सीबीआय आँफिसरना थेट फोनच केला व मला लवकरात लवकर ह्या केसविषयी उलघडा हवायं सांगितलं.
पण त्यांनंतर अर्ध्या तासातच निनावी काँल आला की राजेश कापडेने मरण्यापुर्वी अजुन एक कबुली दिली होती की त्याला मुक्ता मँडम खुप मानसिक त्रास देऊन गवाही बदल म्हणत होत्या, त्यामुळे कंटाळुन मी जीव देत आहे आणि ही रेकाँर्डिंग आमच्याकडे आहे.त्यामुळे उद्या तुमच्यावर केस व्हावी वाटतं नसेल तर चुप्प बसा...नाहीतर आम्ही अधिक चौकशीसाठी तुम्हालाही लवकारात लवकर कापडेजवळ पाठवुन देऊ...म्हणजे मीच पैसे खाऊन हे काम केलंय हे सिध्द करण्याच्यामागे तो लागलाय हे ऐकुन खुपच मानसिक त्रास झाला.पोलिस खात्याचे नाव अश्या रितीने बरबाद होताना पाहुन लाज वाटत होती.काही बोलायची इच्छाच राहिली नाही.
त्या क्षणापासुन जी वाचा बंद केली ती केलीच...बोलुन काही फायदा नाही हे कळलं..दोन महिने रजेवर आहे..."असं म्हणत तिने तोंडावर दोन्ही हात झाकुन घेतले.
डाँ.अभिषेकने आजवर अनेक केसेस सोडविल्या होत्या.पण अशी केस पहिल्यांदाच आली होती.ह्या सगळ्या बोलण्यात त्याला नवलं वाटत होते की एवढं सगळं होऊन मग ही आपल्याशी कशी काय हे सगळं बोलली.गेले दोन महिने तिने कित्येक लोकांना ह्या बाबतीत काहीच रिस्पाँन्स दिला नव्हता मग आपल्याला कसे काय सांगितले ह्याचा तो विचार करत होता.
न रहावुन त्याने तिलाच सरळं विचारले.
"एक विचारु...हे इतकं महत्वाच तु मला कसं काय सांगितलंस? माझ्याशी कसं काय सांगावसं वाटलं तुला?"
ह्यावर ती फक्त हसली....
-क्रमश:
© प्राजक्ता रुद्रवार

Comments
Post a Comment