त्या वळणावर - भाग #1
त्या वळणावर
भाग #1
"चुप...."म्हणत जोरदार थोबाडीत मारल्याचा आवाज आला आणि कुठुन आवाज आला कळले नाही पण सर्वत्र एकदम शांतता पसरली.
"तु मरणार नाहियेस...असं मरायचचं होत तर कशाला जन्म घ्यायचा,त्या आईला वेदना द्यायच्या...आपल्याला वाटलं तर जगायचं आणि वाटलं तर मरायचं...हे काय आयुष्य आहे...आत्महत्या करणारे भ्याड असतात...भ्याड... अरे,हिमतीने जगुन दाखवा मग मानलं...परिस्थितीपुढे इतकं लाचार व्हायचं आणि तेही एका पोलिस इन्स्पेक्टरने...शी...थु...." तो तिच्या खांद्याला पकडुन तावातावात बोलत होता.जोरदार थप्पड बसल्यामुळे जणु ती भानावर आली होती.तेवढ्यात आजुबाजुला गर्दी जमु लागली.आपण बीचवर आहोत ह्याचे त्याला भान आले.
"चल...निघुयात..."असे म्हणत तिला जवळ घेऊन तो गर्दीतुन वाट काढत कार पार्किंगच्या दिशेने चालु लागला.सगळेजण आपल्याकडे पहात आहेत ह्याचे त्याला काहीच वाटत नव्हते.त्याने रिमोटने कारचे लाँक उघडले व तिला समोर बसवुन तो ड्राईव्हिंग सिटवर येऊन बसला.ती अजुनही जणु शुन्यात होती.त्याने गरर्कन गाडी रिव्हर्स घेतली व तो हाँटेलच्या दिशेने निघाला.
हाँटेलवर येईपर्यंत दोघेही एकदम चुप होते.रुममधे आल्यावर त्याने दार लावले व तिला ग्लासात पाणी आणुन दिले.काहीही न बोलता ती पाणी प्याली व तिच्या डोळ्यातुन पाण्याच्या धारा वाहु लागल्या.त्याने तिचे हात हातात घेतले व "तु रडुन घे मुक्ता...मन हलकं कर...तु रड पण अशी शुन्यात जाऊ नकोस..."असं म्हणत त्याने तिला कवेत घेतलं.मुक्ताने मनाला वाट मोकळी करुन दिली.तो फक्त तिला थोपटत होता.त्याला त्याची व मुक्ताची पहिली भेट आठवली.
बाहेर पेशंटची बरीच गर्दी दिसत होती.त्याने नजर फिरवली तर त्यातले बरेचसे चेहरे नेहमीचेच दिसत होते.फक्त एक चेहरा नवीन होता.ती बाकावरच्या एका कोपरयात शांतपणे खाली मान घालुन बसली होती.एकदम केविलवाणी...दिसायला तर खुपच सुंदर,रहाणीमान पाहुन चांगल्या घरातली वाटतं होती...पण खाली मान घालुन बसली होती.तो कोणाकडे पहात आहे हे बघुन असिस्टंट डाँक्टर पुर्वा लगेच म्हणाली,"नवीन केस आहे...फुल डिप्रेशनची...मी अजुन हिस्ट्री घेतली नाहिये...पण आत्ताच तुमच्यासाठी डाँ.दिवाणांचा फोन येऊन गेला...स्पेशली तुमच्याकडे पाठवलंय म्हणुन... ती एक पोलिस इन्स्पेक्टर आहे म्हणे...बाकी ते तुमच्याशी रात्री बोलतीलच म्हणाले आहेत..."
"ओह...आय सी...पुर्वा...नेहमीचे पेशंट्स तु बघुन घे...काही लागलं तर मी येतोच...ह्या नवीन पेशंटला माझ्या कन्सल्टिंग रुम मधे पाठवुन दे..."असे म्हणत डाँ.अभिषेक पुढे गेले.
पाचच मिनिटात ती आत आली.मान खाली घातलेलीच होती.स्वत:च्या विश्वात गर्क होती.तेवढ्यात एक मध्यम वयाच्या बाई पण तिच्या मागे आत आल्या.त्यांनी फाईल समोर केली व त्या खुर्चीवर बसल्या.त्या जराश्या काळजीतच वाटत होत्या.ती जराही न हलता खाली बघत तशीच बसुन होती.त्याने फाईल मधले सगळे पेपर्स चाळले.वाचणे शक्य नव्हते म्हणुन अंदाज घेण्यासाठी पेपर्सवरुन फक्त नजर फिरवली.मग तिच्याकडे पाहुन त्याने विचारले,"बोला...".तिने वर नजर करुन बघितले व ती पुन्हा खाली पाहु लागली.ते पाहुन सोबतच्या त्या बाई बोलु लागल्या,"साँरी डाँक्टरसाहेब...पण हे असंच सुरु आहे...काहीही बोलत नाही,काही सांगत नाही...पुढे सारं आयुष्य पडलयं ह्याची चिंता नाही...काही तरी करा..." त्या एकदम अगतिकपणे म्हणत होत्या.
त्यांच्याकडे पाहुन त्याने विचारले,"आपण..??"
"मी आई आहे हिची..."त्यांनी लगबगीने सांगितले.
"हे बघा आई...तुम्ही वेळ द्या जरा त्यांना...होतील त्या लवकरच नाँर्मल..."असे म्हणत त्याने तिच्याकडे पाहिले.पण तिच्या तोंडावरची माशी हलली नव्हती.मग आपला मोर्चा तिच्या आईकडे वळवुन तो म्हणे,"आपण जरा बाहेर बसणार का?मला ह्यांच्याशी काही बोलायचं आहे..."
"हो..."म्हणत त्या बाहेर गेल्या.तरीही तिच्या चेहरयावर कसलाच परिणाम झालाय असे दिसत नव्हते.मग तिच्याकडे बघत तो म्हणाला,"मिस.मुक्ता टिळक...बोला..काय त्रास होतोय तुम्हाला??"तिने उत्तरादाखल फक्त त्याच्याकडे बघितलं.तोच पुढे म्हणाला,"म्हणजे डोकं दुखतयं का?झोप लागत नाही का? किंवा अजुन काही त्रास होतोय का?"
तिने काहीच उत्तर दिले नाही म्हणुन त्याने पुन्हा तोच प्रश्न विचारला.मग तिने मान वर करुन फक्त मानेनेच नाही म्हणले.
"बरं मग तुम्हाला मला काही सांगावसं किंवा विचारावसं वाटतयं का??"तो म्हणाला.तसे ह्यावेळेस पहिल्याच प्रश्नाला उत्तर देत तिने नकारार्थी मान हलवली.
"ओके...तुमचा त्रास सांगितला नाहित तर डाँक्टर काही देव नाहिये ना मनातले जाणुन उपचार करायला...त्यामुळे तुम्हाला काही त्रास होत असेल तर नक्की सांगा..." असे तो शांतपणे म्हणाला.पण तिने काहीही उत्तर दिले नाही.
त्याने नर्सला बोलावले व तिचे बीपी,पल्स बघायला सांगितले व तोपर्यंत त्याने तिची फाईल बघायला घेतली.सगळे रिपोर्ट्स तसे नाँर्मलच होते.ही एक जमेची बाजु आहे म्हणत त्याने तिचे पेपर्स बाजुला ठेवले.तेवढ्यात ती समोर येऊन बसली.पण तिला कुठलाही प्रश्न पडला नव्हता.जणु दुसरयाचेच चेकअप सुरु आहे अशी ती एकदम शांतपणे बसली होती.ते पाहुन त्याने नर्सला तिच्या आईंना बोलवायला सांगितलं.
"सगळं नार्मल आहे क्लिनिकली...मी जरा डाँ.दिवाणांशी पण केस डिसकस करुन घेतो...तुम्ही उद्या चार वाजता पुन्हा या...एकदोन डिस्कशनचे सेशन्स घेऊयात... मग पुढचे ठरवुयात..."असे सांगुन त्याने तिच्याकडे पाहिले.तिने काहीच प्रतिसाद दिला नाही.त्यांनी होकार दिला व त्या तिला घेऊन निघाल्या.ती पण निघाली,काहीही न बोलता...आईच्या मागे...पण दाराशी जाऊन थबकली.तिने मागे वळुन पाहिले.दोन पावलं मागे येत ती अभिषेकला म्हणाली...
"कुठल्याही चर्चेला सेशन नाव दिलं तरी हा फक्त भुतकाळ उगाळायचा वर्ग असतो...त्यामुळे मी न आलेलीच बरी आहे..."
तिचे बोलणे,आवाजातली जरब पाहुन अभिषेकला जरा आश्चर्यच वाटले.
"ठिक आहे...नको तो विषय काढायला...प्राँमिस...पण मग मनमोकळं गप्पा मारायला येशील??"त्याने विचारले.
ती फक्त स्वत:शी हसली."गप्पा मारण्यासारखे काँमन विषयच नाहियेत..."असे म्हणुन ती निघुन गेली.काही क्षण तो ती गेलेल्या दिशेकडे पहात राहिला.पहिल्यांदा कोणीतरी त्याच्याशी असं बोलुन गेलं होतं.
गेली सहा वर्षे मानसोपचार तज्ञ म्हणुन काम करताना बरयाच वेगवेगळ्या केसेस त्याच्याकडे येत असतं.पण हिची केस एकदम वेगळी दिसत होती.काहीच न बोलणारी ती आज हे तरी का बोलुन गेली असेल असा विचार करत त्याने डाँ.दिवाणांना फोन लावला...
- क्रमश:
© प्राजक्ता रुद्रवार

Comments
Post a Comment