त्या वळणावर - भाग 7
त्या वळणावर
भाग #7
मुक्ता काय सांगणार ह्याचा अंदाज बांधायचा अभिषेकने प्रयत्न केला नाही.त्यापेक्षा हे बोलताना,मनातले सांगताना तिच्यात होणारे बदल व तिच्या चेहरयावरचे हावभाव तो टिपत होता.एक धडाडीची अधिकारी तिच्या बोलण्यातुन जाणवत होती. अभिषेकने काहीही न बोलता डोळ्यांनीच सांग म्हणुन खुणावलं.
ती बोलु लागली," धनंजयने पत्रकार परिषद बोलावली होती.मिडियावाले हजर झाले.मोठ्या व्यक्तीला वाचवण्यासाठीचा हा सगळा प्रयत्न सुरु होता.सगळ्यांच्या देखत हा कबुली जबाब दाखवला जाणार होता.मी खुप काँल केले पण कानडे सर भेटलेच नाहित.म्हणुन मी त्यांचे आँफिस गाठले.तिथे त्यांच्या हाताखालच्या आँफिसरला विश्वासात घेऊन मी हे काम किती तातडीचे आहे सांगितले.त्याने सरांना काँल लावुन ह्याची कल्पना दिली.ते ताबडतोब येतो म्हणाले.रानडे सर पत्रकार असताना गेले नाहित तर मिडियावर काहीच येऊ शकत नाही हे मला माहिती होते.त्यामुळे ते तिथे जाण्यापुर्वी सगळं सांगण गरजेचे होते.पण इथेही धनंजयला माहिती पुरवणारा कोण माणुस होता देव जाणे.मी इथे आलीये हे त्याच्यापर्यंत कळले.ते पाहुन ह्या प्रकरणात गुंतागुंत वाढावी म्हणुन धनंजयने कापडेचा कबुली जवाब लिक केला.
मी रानडे सरांना सगळी कल्पना दिली.ते आमच्या पोलिस स्टेशनला पोहचणार त्यापुर्वी टि व्ही वर बातम्या येऊ लागल्या..."कावेरी बलात्कार प्रकरणातील खरया आरोपीची कबुली...अकारणच मोठ्या व्यक्तीला अडकवण्याचा प्रयत्न..."
रानडे सरांना माहिती असल्यामुळे त्यांनी खुपच प्रश्न विचारले.राजेश कापडेलाही बोलावुन त्यांनी उलट तपासणी घेतली.पण तो काहीच बोलत नव्हता.मला खुपच आश्चर्य वाटलं.
मी राजेश कापडेला जोरात ओरडुन विचारले,"कापडे सांगा ...खरं काय आहे ते सांगा...बोला..."
तो दचकला.पण तो काही बोलेनाच.मला संताप आला.इतके दिवस ठेवलेला संयम सोडुन मी त्याच्यावर जोरात धावुन गेले.
मी त्याच्या काँलरला गदागदा हलवुन विचारले," सांग...कुणालाही न घाबरता सांग...काय खरं आहे ते..."
माझा तो अवतार बघुन सगळेच घाबरले.धनंजयने लगेच डाव साधला. तो माझ्याकडे बघत म्हणाला,"इन्स्पेक्टर मुक्ता...तुम्ही आरोपीवर अश्याप्रकारे दबाव आणु शकत नाही...तुमचा काय खाजगी इंट्रेस्ट आहे माहिती नाही..."
माझा राग अनावर झाला.सगळ्यांच्या देखत मी चिडुन धनंजयला थोबाडीत लावुन दिली.क्षणभर सगळीकडे शांतता पसरली.माने व लेडी हवालदारांनी मला बाजुला घेतले.माझ्याकडे खुनशी नजरेने बघत धनंजय गाल चोळत होता.पण माझ्या ह्या एका चुकीमुळे त्याचे फावले.त्याने रानडे सरांना माझ्याविरुध्द सांगायला सुरुवात केली आणि माहिती आहे...त्याने काय आरोप केला??..."हे बोलुन ती रडायला लागली.
इतका वेळ गप्प ऐकत असलेल्या अभिषेकला पण तिला रडताना पाहुन वाईट वाटलं.तो उठुन उभा राहिला व त्याला वाटले की तिला जवळ घ्यावे.पण तसं आपलं डाँक्टर पेशंटच नातं पहाता हे योग्य ठरणार नाही हा विचार करुन त्याने तिच्या हातावर हात ठेवला.त्याने तिला रडु दिलं.मुळातच गोरी असलेल्या मुक्ताचा चेहरा रडुन लाल झालेला दिसत होता.अभिषेकने तिला हातावर थोपटल्यासारखं केलं.तिने त्याच्या डोळ्यात पाहिलं व विचारलं,"डाँक्टर मी चुकले असेल...पण ह्याची इतकी मोठी शिक्षा मिळावी का हो?.."
खरंतर तिने सांगितलेले अर्धवट असल्यामुळे त्याला कसली शिक्षा हे कळले नाही...पण तिला शांत करण्यासाठी तो म्हणाला,"नक्कीच नाही...चुक आहे सगळंच त्याच..."
तिने मानेनेच होकार दिला.काही क्षण शांतता पसरली.
जरासा विषय बदलावा म्हणुन त्याने तिला विचारले,"आणि हे सगळं तु एकटीने सहन केलंस मुक्ता ?"
ती स्वत:शीच हसली आणि म्हणाली,"आईला तुम्ही भेटलात...ती अशी नाहिये की हे सगळं कळेल आणि मग कोण आहे माझं असं आयुष्यात...मैत्रिण म्हणुन रागिणीच एक जवळची आहे...तिला बरयापैकी सागितलं पण त्याच काळात ती दोन महिन्यांसाठी अमेरिकेत गेली होती...मग काय...मी व माझा लढा..."
अभिषेक उठला व उभा राहिला.रिव्हर व्ह्यु हाँटेलच्या आत बसल्यामुळे बाहेर दिसणारया नदीच्या वाहत्या पाण्याच्या प्रवाहात उठणारे तरंग पहाताना त्याच्या मनात खुप सारे विचार सुरु होते.त्याने मागे वळुन पहाता मुक्ता शांतपणे डोळे मिटुन बसली होती.
काही क्षण असेच गेले.अभिषेकने तिला विचारले,"तु काय खाणार मुक्ता?...मला जाम भुक लागलीये..."
ती हसली,"तुम्हाला काय खायचंय ते मागवा..."
त्याने सँडवीच व काँफी आँर्डर केली.जरा वेगळा विषय म्हणुन तो म्हणाला,"काय आहे, मी कधी असा बाहेर जात नाही केससाठी,सगळे माझ्याच कन्सल्टिंग रुम मधे येतात...त्यामुळे
वेळ कसा गेला आणि लंच टाईम झाला कळलं नाही बघ...तुझ्या जेवणाचे काय?"
ती फक्त हसली,"जेवणाची काय जगण्याची इच्छाच गेलीये...तुम्हाला खरं वाटणार नाही पण कित्येक दिवसांनी मी हे भरभरुन बोलले म्हणुन मला शांत झोप लागत आहे...नाहीतर मी झोपेच्या गोळ्या घेत आहे गेले कित्येक दिवस..."
त्याला हे अपेक्षितच होतं.अश्या बरयाच केसेस मधे तो स्वत: पेशंटला सांगत असे...त्याने एक लांब श्वास सोडला.त्याच्या मनात काही तरी चलबिचल चाललीये हे कळुन तिने विचारले,"मी तुमचा खुप वेळ घेतेय ना?.."
तो लगेचच म्हणाला,"नाही नाही...तसं काही नाही...खुप सारया केसेस मधे आम्हाला वेळ द्यावा लागतो पण आता तु नुसती एक केस नसुन एक वेगळी जवळीक निर्माण केली आहेस..." तो अगदी सहजतेने बोलुन गेला.पण मुक्ता क्षणभर त्याच्याकडे पहात राहिली.
तिचे तसे बघणे पाहुन त्याने तिच्याकडे बघत विचारले,"काही चुकीच बोललो का मी?.."
तिने मानेनेच नकार दिला तसा तो रिलँक्स झाला.
तिने त्याला विचारले,"पुढे काय झालं सांगु?.."
त्याला वाटलं की एका दिवशी बोलुन तिला ताण येऊ नये.म्हणुन तो म्हणाला,"तुला ताण येणार नसेल तरच सांग...नाहीतर पुढच्या भेटीत सांग..."
आज सोबतीला
असताना कोणी...
पुसाव्या वाटल्या
नकोश्या आठवणी...
असे तिच्या मनात आले आणि ती मनापासुन हलकेच हसली.त्याला कळले नाही की मुक्ता का हसली.त्याने भुवया उंच करुन विचारले,"काय झाले?.."
तिने मानेनेच काही नाही खुणावले तसे त्याने खांदे उडवत ओके म्हणलं.
ती बोलु लागली,"धनंजयने माझ्यावर घाणेरडा आरोप लावला की मी पैसे खाऊन त्या राजकीय नेत्याच्या भावाला ह्या प्रकरणात गोवायचा प्रयत्न करत आहे.मला काही वेळ कळलंच नाही की किती सफाईदारपणे हा प्लँन्स करतो ना...मी त्याचे हे खोडुन काढायचा प्रयत्न केला पण माझ्या नुसत्या बोलण्यावर विश्वास असला तरी धनंजय माझ्याविरुध्द काही काही पुरावे गोळा करत होता.मी राजेश कापडेच्या कडे चौकशीसाठी गेलेले सीसीटीव्ही कव्हरेज त्याने घेतले होते.आरोपीला भेटुन फुस लावायचा प्रयत्न केला जातोय हे तो सिध्द करु पहात होता.
मी पण जिद्दीला पेटले होते...मी ही म्हणाले त्याला की ."बघु तु माझं काय बिघडवु शकतोस..."
तो गडगडाटी हसत म्हणाला,"तयार रहा पुढे काय काय होत ते पहायला...धनंजय नाव आहे माझं...धनंजय..."
मी काहीही न बोलता तिथुन निघाले...मला विश्वास होता की माझा आजपर्यंतचा रेकाँर्ड व बाकीचे कामकाज पहाता माझ्या विरोधात उभं रहाणं तेवढं सोप नाहिये...
पण माझा विश्वास चुकीचा ठरला...." हे सांगुन ती गप्प बसली.तिला आठवत होता तो तिचा विसरु न शकणारा भुतकाळ...
-क्रमश:
© प्राजक्ता रुद्रवार

Comments
Post a Comment