त्या वळणावर - भाग 5

त्या वळणावर

भाग #5

"तो रागात निघुन गेला पण मी अजिबात घाबरले नव्हते...असे छप्पन पाहिलेत अश्या अभिर्भावात मी पुढे कामाला लागले...पण तो माझ्या बोलण्यावर लक्ष ठेवुन होता...धनंजय हा पोलिस खात्याच्या नावाला मोठा कलंक होता हे मला कळत होत.फक्त सिध्द करायचं बाकी होतं...."मुक्ता सांगत होती.पण तिच्या डोळ्यासमोर सगळा प्रसंग येतोय असे तिच्या चेहरयावरील हावभावांवरुन दिसत होते.
तेवढ्यात डाँ.अभिषेकचा फोन वाजला.
"साँरी एक मिनिट..."म्हणत त्याने काँल उचलला.
मुक्ता पण तोपर्यंत तिचा फोन बघत होती.काहीतरी वाचले आणि तिचा चेहरा पडला.तिने ,"चला,पुन्हा भेटुयात..."असे त्याला म्हणले.
"मी तुला पुन्हा बोलतो..."म्हणत त्याने फोन बंद केला व तिला विचारले,"काही प्राँब्लेम..??"
तिने नाही अशी मान हलवली व ती बाहेर निघाली.अभिषेकने तिला विचारले,"मुक्ता...तु कशी आली आहेस??...मी सोडु का??..."
तिने क्षणभर विचार केला.बहुदा टँक्सीनेच अाली असावी ती...
तिने विचार करुन नको म्हणलं.अभिषेकने खांदे उडवत नो प्राँब्लेम म्हणत टँक्सीला हात केला.ती बसली व टँक्सी निघाली.ती दुर जाईपर्यंत आपण तिच्याकडे बघत आहोत हे त्याला जाणवले व तो त्याच्या कारकडे आला.
हाँस्पिटलमधुन डाँ.पुर्वाचा फोन आला होताच.तो हाँस्पिटलमधे गेला पण उशीरापर्यंत कुठला विचार करायला वेळच मिळाला नाही.शेवटचा पेशंट गेला तेव्हा रात्रीचे दहा वाजत आले होते.काही क्षण त्याने खुर्चीवरच मान टाकल्यासारखं केलं.तेवढ्यात पुर्वा आलीच.तिला बघुन तो म्हणाला,"चल...झालं तुझं?? निघायचं..."ती हो म्हणाली.काही मिनिटात दोघे निघाले.कारमधे बसल्यावर पुर्वाने विचारलं,"कसं झालं आजच इन.मुक्तासोबतच सेशन?? काही कळलं का?"
"तसं चांगलंच म्हणायच कारण ती बरीच बोलली...आत्ता शांत असली तरी डँशिंग आहे ती...पोलिसी खाक्या आहे तिच्यात...पण वेळ लागेल असं दिसतयं...तिला त्रास होतोय ह्या आठवणींचा हे जाणवलं...पण माझ्याविषयी विश्वास वाटला हे काही कमी नाही...नाहीतरी दोन महिने तिने असेच काढले होते..."अभिषेक उत्तरला.
पुर्वाने मान हलवली..."सर,एक विचारु...डाँ.दिवाण इतके सिनियर आहेत तरीही त्यांनी काही प्रयत्न कसा केला नाही हे विशेष वाटतंय..."
"अरे नाही...तसं नाहिये...डाँ.दिवाणांकडे ती गेली होती व तिथे तिने काही सांगितलं नाहीये...का ते कळंल नाही...मुक्ताच्या एकंदरीत बोलण्यावरुन हे कळलंय की ती माहिती काढुनच बोलत आहे...अरे गंमत म्हणजे..तिनचे माझी माहिती काढली व मग बोलली...वाटते तितकी साधी केस नाहिये..."तो म्हणाला.
पुर्वाने फक्त मान हलवली. "सर,सावध रहा हं..."तिने पुढे म्हणले.
"हो...तु बरोबर म्हणत आहेस..."तो म्हणाला.
बोलणे संपेपर्यत स्टेशन आल्यामुळे पुर्वा उतरली.अभिषेक घरी आला व त्याला जाणवले की त्याला खुप भुक लागलीये.मावशी स्वयंपाक करुन गेल्या का बघायला तो किचन मधे आला तर त्याला त्याच्या आवडीची वांग्याची भाजी केलेली दिसली.तो खुष झाला.फ्रेश होऊन जेवायला बसताना त्याने टिव्हीवर न्युज चँनेल लावले व तो वाढुन घेऊ लागला.तेवढ्यात कँबमधे मुलीचा खुन..ड्राईव्हरला ताब्यात घेण्यात आलंय...पांढरा ड्रेस घातलेल्या ह्या तरुण मुलीची ओळख पटवणे सुरु आहे असे ऐकुन तो धावत टिव्ही जवळ आला.पण त्यामधे फोटो पण दाखवला नव्हता.आज मुक्तानेही पांढराच ड्रेस घातला होता.
ती अचानक गेल्यामुळे अभिषेकला शक आला.काय करावं विचार करत त्याने तिला सरळ फोनच केला.
इतक्या रात्री कोण म्हणुन मुक्ताने फोन कडे पाहिले तर डाँ अभिषेक होते लाईनवर.तिने फोन उचलला.तिने हँलो म्हणताच अभिषेकने हुश्श केले.तिने विचारले,"बोला डाँक्टर..."
तो म्हणाला," काही नाही...व्यवस्थित पोहोचलीस का म्हणुन फोन केला..."
तिला आश्चर्य वाटले...संध्याकाळी सातला निघाल्यावर आत्ता कसं काय विचारत आहे.तिने विचारले,"काही विशेष कारण..."
तो म्हणाला,"नाही...संध्याकाळी वेळ मिळाला नाही ना म्हणुन आत्ता विचारतोय...चलो उशीर झालाय...उद्या बोलुयात..."
त्याच्या आवाजातली काळजी तिला कळत होती पण असे अचानक का हे कळलं नाही.
मुक्ता सेफ आहे हे ऐकुन त्याला बरं वाटलं.पण ह्या गोष्टीचा विचार न करता तो पटकन झोपायला गेला आणि दिवसभराच्या थकव्यामुळे त्याला पटकन झोप पण लागली.
सकाळी उठल्यावर नेहमीप्रमाणे त्याने फोन हातात घेतला तर मुक्ताचा "थँक्स फाँर एव्र्ही थिंग .."म्हणुन मेसेज आला होता.त्याला हसु आले.त्याने सहज तिचा डीपी पाहिला.दिसायला मुळातच सुंदर असलेल्या मुक्ताच्या चेहरयावर तिच्या कर्तृत्वाचं एक तेज दिसत होतं.त्याच्या पहाण्यात खुप कमी मुली अश्या डँशिग होत्या.त्याला प्रश्न पडला की काय झाले असेल पुढे तिच्या आयुष्यात? आणि तो स्वत:शीच दचकला.आपण किती मुक्तामय झालो आहोत,हे त्याला जाणवलं व तिचा विचार दुर सारत तो पेपर वाचु लागला.
हाँस्पिटलमधे गेल्या गेल्या नेहमीप्रमाणे काही अपाँईंटमेट्स आहेत का हा विचार करत त्याने डायरी चेक केली.दुपारी तीनपर्यंत तो फुल पँक होता.त्याने डाँ.पुर्वाला बोलावले आणि संध्याकाळी काही अपाँईंटमेट्स देऊ नकोस हे सांगितले.तिला अंदाज आलाच की मुक्ताशी भेटणार असतील...हे मुक्ता प्रकरण संपेपर्यंत काही खरे नाही,असा विचार करत ती कामाला लागली.
आज मुक्ताने भेटायला दुसरीच जागा निवडली होती.ठरल्याप्रमाणे ती आली देखिल.पाहिल्या भेटीपेक्षा ती खुप प्रसन्न दिसत होती.चेहरयावर स्माईल पण होती तिच्या.
आल्या आल्या त्याने तिला स्माईल दिली.
"आज वेळ न घेता आधी बोलते...काल तुमचा खुपच वेळ
घेतला पण पुढचं ऐका.."असे म्हणत ती बोलु लागली....
"हळुहळु मी व माने मिळुन धनंजयचा पोलखोल करायची संधी शोधत होतो...एकदा का पोलखोल झाली,सगळ्यांना विश्वासात घेऊन त्याच्यावर पुढे कारवाई करता येईल हा विचार होता..त्यातच एक मोठी केस आली...राजेश कापडे नावाच्या मुलाला अटक करण्यात आली...त्याने घरफोडीचा प्रयत्न केला व तिथे त्या घरातल्या वाँचमनला जाग आली म्हणुन त्याने पळायचा प्रयत्न केला होता...पण वाँचमनने त्याला पाहिले व ते त्याला पकडणार हे पाहुन त्याने वाँचमनला धक्का दिला व तो पळाला...तरी पुढे उभा असलेल्या ड्राईव्हरने राजेश कापडेला पकडले व त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले..त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला...
त्याचदिवशी शहरातील एका प्रख्यात बिझिनेसमन कम गुंडाच्या भावाने बलात्कार केल्यामुळे त्याला पकडण्यात आले होते... त्याला ह्या आरोपातुन निर्दोष मुक्त करावं म्हणुन त्याचा भाऊ खुप प्रयत्न करत होता...त्यांनी धनंजय सारखा इन्स्पेक्टर आहे पाहुन त्याला तसे सांगितले... धनंजय ह्या कामात माहिरच होता...त्याच डोक अश्या कामात खुपच चालायचचं...धनंजयने एक कट रचला ,त्यासाठी त्या गुंडाच्या भावाकडुन जब्बर पैसे घेतले व राजेश कापडेलाच ह्या बलात्कार केस मधे गोवले...घरफोडीचा प्रयत्न केलेला हा साधा गुन्हेगार आता हा बलात्काराचा गुन्हा साबित झाला तर ह्या मोठ्या गुन्ह्यातुन सुटणार नव्हता...आम्ही दुसरयादिवशी येईपर्यंत सगळे कागदपत्र बदलुन टाकण्यात त्याला यश आले होते....मी तर काही क्षण काय चाललयं हे शोधण्यातच घालवले...आम्ही राजेश कापडे चे स्टेटमेंट घेऊन ठेवु हा विचार करतच होतो पण संधी मिळत नव्हती..."
ती बोलायची थांबली व विचारात पडली...तो फक्त तिच्याकडे बघत होता.तिने त्याला विचारले,"तुम्हाला काय वाटतं...काय केलं असेल धनंजयने पुढे??काही गेस..."
त्याने फक्त नकारार्थी मान हलवली...तिने एक लांब श्वास सोडला व ती पुढे बोलु लागली....

-क्रमश:

© प्राजक्ता रुद्रवार

Comments

Popular posts from this blog

त्या वळणावर - भाग 8

त्या वळणावर - भाग #1