त्या वळणावर- भाग 4
त्या वळणावर
भाग #4
"नाही...नाशिकच्या वास्तव्यात तर अजिबातच वेळ मिळाला नाही कोणाशी मैत्री करायचा...आणि तसा कोणी जोडीदारही...त्यामुळे कोणाशी मैत्री करायची वेळच आली नाही..."
मुक्ताचे हे बोलणे एेकुन तो फक्त हसला.तो तिच्या हालचालींवर लक्ष देऊन होता.काँफीच्या कपची कडा पुसत तिने काँफीचा एक सीप घेतला.तिला जरा तरतरी वाटली.कप टेबलवर ठेवुन ती त्याच्याकडे पहात म्हणाली,"तुमची काही वेगळी अपेक्षा होती का?.."
तिच्या ह्या अनपेक्षित प्रश्नाने तो क्षणभर दचकला.तिच्याकडे पहात तो म्हणाला,"नाही...तसे नाही...पण अंदाज घेत होतो...आणि तुझ्याविषयी काहीच माहिती नसल्यामुळे अंदाज येत नाहियेत..."
ती हसली व हातातला कप गोल फिरवत त्याच्या म्हणाली,"विशेष आहे...माझी मैत्रिण रागिणी आणि आमचे हवालदार माने ह्यांनी काहीच सांगितलं नाही का?.."
हे ऐकुन मात्र अभिषेक उडालाच.तिच्या नजरेला नजर न देता तो जागेवरुन उठला व खुर्चीवर हात ठेवुन म्हणाला,"विशेष आहे...तुला माहिती आहे ते भेटुन गेले ते...तु माझ्या पण मागावर आहेस म्हणजे...तुझ्या मनात चाललयं तरी काय..."
ती काही क्षण गप्प राहिली.मोठा श्वास सोडुन ती म्हणाली,"मागावर अशी नव्हते...पण तुमच्या हालचालीवर लक्ष नक्कीच ठेवुन आहे..."
"पण का?..."जराश्या उत्सुकतेने म्हणाला.
"का...तुम्ही खरंच मानसोपचार करत आहात की सीआयडी गिरी हे ठरवत होते..."ती म्हणाली.
"हे बघ मुक्ता...चार दिवसापुर्वी डाँ.दिवाणांनी तुझी केस रेफर केलीये...त्या शिवाय माझा तुझ्या वैयक्तिक जीवनाशी काहीच संबंध नाहिये..."तो स्पष्ट म्हणाला.
ती काहीच बोलली नाही.त्याने खुर्चीवरचा हात काढला व खुर्चीवर येऊन बसला.खुर्ची तिच्या पुढे करत त्याने तिच्या नजरेत पहात विचारले,"तुझा जर विश्वास नव्हता तर मग आज तु भेटायला का आलीस?.."
त्याच्या ह्या स्पष्ट प्रश्न ऐकुन ती जरा विचारात पडली."नाही तसं नाही...पण विश्वास वाटला म्हणुनच बोलायला आलेय...",ती म्हणाली.
तिच्या ह्या जुजबी उत्तराला तो फक्त हसला.बहुधा तिलाही ते कळत होत.ती पुढे बोलु लागली,"नाशिकपर्यंतचा काळ खुप छान गेला.पोलिसदलात नोकरी केल्याचा अभिमान वाटावा असा.
एका रात्री फोन आला की हाँटेल बंजारामधे अवैध धंदे चालतात.रात्री लपवुन वेश्या व्यवसाय चालतो.त्या रात्रीच मी व माझ्या टिमने हाँटेल बंजारावर धाड घातली.एकदम तीस पोलिसांचा ताफा घुसल्यावर कोणाला पळता आले नाही.वेश्या व्यवसाय करण्यासाठी मुली पुरवणारी आन्टी पळुन जात होती.मी तिला दंडुक्याने जोरदार मारले,"माने,घ्या हिला आत..." पटापट सगळ्यांना पकडले व गाडीत घातले.आल्यावर त्या आन्टीला लाँकअपमधे टाकुन तिच्याकडुन त्यांची पुर्ण गँग पकडण्यात यश मिळवले.आजपर्यंतची ही सगळ्यात मोठी धाड ठरली होती.त्यानंतर बरेच अवैध धंदे बंद झाले.तो काळ एकदम मस्त गेला...."ह्या आठवणी सांगताना तिचा चेहरा खुलला होता.
तो तिच्याकडे बघत होता.तिच्या चेहरयावर खुपच आत्मविश्वास दिसुन येत होता.
"मग...पुढे काय झालं..."त्याने विचारलं.
तसे तिच्या चेहरयावरचे भाव बदलले.ती गप्प राहुन पायाने जमीन उकरत होती.ते पाहुन तिला होणारा मानसिक त्रास कळुन येत होता.
त्याने तिला म्हणले,"माझ्यामते आजसाठी इथेच थांबुयात का?..तुला जेव्हा कंम्फर्टेबल वाटेल तेव्हा बोलुयात..."
ती काहीच बोलली नाही.विषय बदलत त्यानेच विचारले,"अाता रिलँक्स मुडमधे अजुन एक एक काँफी घेऊयात?"
ती हो म्हणाली.त्याने वेटरला बोलावुन दोन काँफी आँर्डर केल्या.
"एक विचारु??आत्ता तुम्हाला काय वाटतयं माझ्याविषयी??.."
तिने डाँ.अभिषेकला विचारले.
स्वत:शी हसत त्याने फक्त नकारार्थी मान हलवली.
"म्हणजे काय...काहीच वाटत नाहिये...काय वाटतेय माझ्या सायकाँलाँजी विषयी ??"तिने पुन्हा विचारले.
"मुक्ता...तासाभराच्या संभाषणाने एखाद्याच्या सायकाँलाँजीविषयी असा निर्णय घेता आला असता तर आयुष्य किती सोपे झाले असते ना..."तो म्हणाला.तसे ती हो म्हणत हसली.
"तुमच्याविषयी जसे एेकले तसेच आहात तुम्ही..."ती म्हणाली.
"अरे वा...माझ्याविषयी काय ऐकलंय ते तरी सांग..."तो म्हणाला.
तेवढ्यात काँफी आली म्हणुन तो बोलायचे थांबला.काँफीचा गरम घोट घेत ती म्हणाली,"तुमच्या विषयी बोलण्यासाठी आपण वेगळं सेशन घेऊयात..."हे ऐकुन तो हसला.
ती पुढे बोलु लागली,"एका वर्षापुर्वी मुंबईमधे बढतीवर बदलुन आले.इथे मात्र खुपच वेगळे वातावरण होते.लेडी पोलिस इन्स्पेक्टर म्हणुन जबाबदारीची पोस्ट होती.त्यामुळे मी खुप उत्साहात होते.तीन चार महिन्यात सगळ्यांचा स्वभाव कळायला लागला.आम्ही दोनच लेडीज स्टाफ होतो आमच्या स्टेशन मधे बाकी सगळे पुरुषच होते...सहा महिन्यात सगळ्याशी चांगले ट्युनिंग जुळत होते तेव्हाच साधारण सहा महिन्यांपुर्वी एक पोस्ट रिकामी झाली,त्या जागी इन्स्पेक्टर धनंजय म्हणुन रुजु झाला.तो आला त्यानंतर सगळ्या स्टाफशी त्याची ओळख करुन देण्यात आली.माझा नंबर आला,काय माहिती त्याची ती नजर मला अजिबात आवडली नाही.पहिल्या दिवसापासुनच मला तो काही आवडला नव्हता.पण त्यामागे काही कारण नव्हत म्हणुन बोलुन फायदा नव्हता.
त्यादिवशी एका बाईची केस आली.महिला म्हणुन आमच्याकडे पाठवण्यात आले पाहिजे हे अपेक्षित होते.पण तरीही हा तिला प्रश्नावर प्रश्न विचारत बसला होता.म्हणुन मी जरा टोकलं हे त्याला आवडलं नाही.त्याने मी घरी निघताना जवळ येऊन म्हणलं,"मी काय माणुस आहे माहिती नाहिये तुला...जास्त मधे मधे करायचं नाही..." आणि तो निघुन गेला.
"असले छप्पन पडलेत बोलणारे..."म्हणत मीही चल निघ...म्हणत घरी निघाले.
पण हळुहळु पाहिलं तर त्याने पैसे खाऊन केसेस सोडवायला सुरुवात केली हे ऐकु येऊ लागले होते.एस.पी.साहेब पण त्यात गुंतले आहेत कळल्यामुळे मला आश्चर्य वाटत होते...."
ती बोलायची थांबली.अभिषेकने पाण्याचा ग्लास तिच्यासमोर केला.पाणी पिऊन टिशुने ओठ टिपत ती अभिषेककडे पाहु लागली.
"कसला विचार करत आहात??" तिने त्याला विचारले.
"खरं सांगु?? ऐकवेल??" त्याने तिच्याकडे पाहुन विचारले.तिने हो म्हणत मान हलवली.
"तु पोलिसमधे असुन इतक्या छोट्या गोष्टीने घाबरुन चुप्प बसलीस...ही तर खुपच सामान्य गोष्ट आहे... ह्या परिस्थितीत तुझ्यासारख्या मुलीने गप्प रहाणे म्हणजे तुझ्यात काय डँशिंगपणा राहिला ग..."तो म्हणाला.
ती हसली...म्हणाली,"मी गप्प नाही बसले...हाच तर प्राँब्लेम झाला ना...पुढे ऐका तर...पैसे घेणे काय अन बायकांशी सलगी करणे काय माझ्यामते हा एक गुन्हातच होता.मी व हवालदार माने म्हणुन माझे असिस्टंट आहेत,जे तुम्हाला भेटुन गेलेत,दोघांनी ह्याचा छडाच लावायचा ठरवलं..."ती सांगु लागली तसे अभिषेक मन लावुन ऐकत होता.
ती पुढे बोलु लागली,"चार महिन्यांपुर्वीचा दिवस असेल...एका कंपनीतील महिला कर्मचारीने आँफिसमधील एच आर मँनेजर विरुध्द अश्लिल चाळे केल्याबद्दल तक्रार केली...अश्या केसेस आमच्याकडे कायमच येत असतात म्हणुन आम्ही नेहमीप्रमाणे एफआय़आर लिहुन त्या एच आर मँनेजरला पोलिस स्टेशनला बोलावले..ती महिला बसुन होती तेव्हा धनंजयने तिला अश्लिल म्हणजे नक्की काय काय केलं हे विचारायला सुरुवात केली..तिने जुजबी उत्तर दिले..ते ऐकुन त्याने तिच्या जवळ येऊन पुन्हा विचारले.तिने काहीच उत्तर दिले नाही.ते पाहुन तो काही बोलणार तेवढ्यात मीच त्याच्यावर ओरडले,"इन.धनंजय...तुम्हाला कळतंय का तुम्ही पोलिस स्टेशन मधे आहात आणि स्वत: इन्स्पेक्टर आहात??तुम्ही स्वत:च्या कामाला लागा..."
त्याने माझ्याकडे रागाने पाहिले व तो निघुन गेला...
-क्रमश:
© प्राजक्ता रुद्रवार

Comments
Post a Comment