त्या वळणावर - भाग 2
त्या_वळणावर
भाग #2
"अभिषेक...केस जरा वेगळी आहे म्हणुनच तर तुझ्याकडे पाठवली आहे...मला विश्वास आहे की तुच तिला ह्यातुन बाहेर काढु शकशील..."डाँ.दिवाण बोलत होते पण अभिषेक विचारात पडला होता.
तेवढ्यात ते पुढे बोलु लागले,"थोडक्यात सांगतो,सध्या ती पोलिस इन्स्पेक्टर पदावर आहे.खुपच जिद्दीने,मेहेनतीने ती ह्या पदापर्यंत लहान वयातच पोहोचली.बरयाचश्या केसेस तिने सफाईदारपणे हाताळल्यात.पण अचानक काय झाले कळलं नाही ती मुकी असल्याप्रमाणे वावरतं आहे.कसला तरी जबरदस्त धक्का तिला बसला असावा असा एक अंदाज आहे.पण तिला दु:ख शेअर करायच नाहिये...तिच्या हाताखालच्या,आसपासच्या सगळ्यांना विचारुन झालयं,पण कोणालाही काही माहिती नाही हे विशेष...असं अचानक जबरदस्त काहीतरी घडलं असावं,पण ते तिलाच माहिती...त्यामुळे तुझ्याकडे पाठवलंय... बघ काही बोलतीये का?..."
अभिषेकचा काहीच रिप्लाय येत नाहिये पाहुन डाँ.दिवाणांनी त्याला विचारले,"ऐकतो आहेस ना?...कसल्या विचारात पडला आहेस?.."
"नाही तसं काही नाही...पण विचार करण्यासारखंच आहे हे सगळं...चला...बघुयात काय करु शकतो मी ह्या केस मधे ते...काही प्रगती वाटल्यास सांगतो तुम्हाला..."अभिषेकने कसलातरी विचार करतच उत्तर दिले हे डाँ.दिवाणांदेखिल जाणवले.
कामाच्या नादात पुढचा तासभर अभिषेकला विचार करायला मिळालाच नाही.शेवटचा पेशंट बघत असतानाच डाँ.पुर्वा आत आली.अभिषेकला तिने विचारले,"आज मला सोडणार का स्टेशन पर्यत??"अभिषेक म्हणाला,"हो...सोडतो ना...लेट्स पँक अप...खुप झाले आज साठी..."
"हो ना..."म्हणत ती तिचे सामान आणायला गेली.अभिषेकनेही असिस्टंटला काही सुचना दिल्या व तो बाहेर पडला.
गाडी सुरु होऊन काही वेळ गेला तरी अभिषेक शांतच होता हे पाहुन पुर्वाने त्याला टोकलं,"काय सर....कसला एवढा विचार करताय आज??"
"काही नाही ग...आजची त्या पोलिस इन्स्पेक्टरची केस...जरा वेगळी आहे ना...म्हणुन विचार करत होतो..."तो म्हणाला.
त्यानंतर बराच वेळ दोघांची ह्याच विषयावर चर्चा सुरु होती.स्टेशन आले म्हणुन पुर्वा उतरली व अभिषेक तसाच घरी आला.
घरी आल्या आल्या दिवसभराचा थकवा दुर करण्यासाठी एकीकडे त्याची आवडीच्या गझल्सचे कलेक्शन लावुन मंद प्रकाशात वाचत बसलं की त्याला खुप रिलँक्स वाटत असे.आजही आल्या आल्या त्याने म्युझिक प्लेअर सुरु केला व फ्रेश वाटावं म्हणुन तोंडावर पाणी मारलं.त्याच लक्ष गेलं तर जगजीत गात होता...
मुँह की बात सुने हर कोई
दिल के दर्द को जाने कौन
आवाज़ों के बाज़ारों में
ख़ामोशी पहचाने कौन ।
क्षणभर तो स्तब्ध झाला.नेमका हाच भाव तिच्या डोळ्यात होता शेवटचं वाक्य बोलुन जाताना.म्हणुनच आपण इतक्या विचारात पडलो हे त्याला जाणवले.नाहीतर आजपर्यंत अश्या अनेक केसेस त्याने सहजतेने हाताळल्या होत्या.कधी अशी इनव्हाँलमेंट वाटली नव्हती.
दुसरयादिवशी हाँस्पिटलमधे आल्या आल्या त्याने डाँ.पुर्वाला सांगुन मुक्ताची सारी माहिती मागवली.तिच्याशी न बोलता,तिच्या आँफिसमधील लोक,स्टाफ,तिची मैत्रिण ह्यांना माहिती देण्यासाठी बोलावलं.डाँ.पुर्वाला जरासे आश्चर्यच वाटलं.ती तसे त्याला म्हणालीसुध्दा,"सर...सायकाँलाँजी पेक्षा ही केस सीआयडी सारखी सोडवायच्या विचारात आहात का?"
तो फक्त हसला.म्हणाला,"तु पण भारी आहेस बघं...सगळंच कसं कळतं तुला...".हसत तिने हात जोडले व ती कामाला लागली.
ठरल्याप्रमाणे मुक्ताची मैत्रिण रागिणी भेटायला आली.अभिषेकने तिला त्याचे बोलावण्यामागचे कारण थोडक्यात सांगितले.ती ओके म्हणाली.
"बरं मग मला मुक्ता विषयी जरा माहिती द्यालं का मिस.रागिणी..."त्याने तिला विचारले.
"हो सर,मुक्ता व मी लहानपणापासुनच्या मैत्रिणी...तिचे बाबा ती लहान असतानाच वारलेत...काकुंनीच मोठ्या कष्टाने तिला मोठ केलं...त्याची तिला जाणीव होती म्हणुन तिने ही कष्ट घेऊन खुप मेहेनतीने ही नोकरी मिळवली...मुक्ता मुळातच हुशार व खंबीर मनाची असल्यामुळे हे शक्य झालेय..."ती सांगत होती.अभिषेक मन लावुन तिचे ऐकत होता.
"अशात काही डिस्टर्ब करणारी अशी काही घटना घडली का तिच्या आयुष्यात..."त्याने विचारले.
तशी ती म्हणाली,"हो सर...जितकं मला माहिती आहे ती गेला महिनाभर च खुप डिस्टर्ब होती...अस्वस्थ...तिच्या पोलिस स्टेशन मधे एका आरोपीने आत्महत्या केली...त्यामुळे ती डिस्टर्ब होती...पण तिच्यावर त्याचा कुठलाही तसा आरोप केला गेला नाहीये...माहिती नाही पण ती अशी एकदम गप्प गप्पच झाली त्यानंतर..."
"तुम्ही कारण विचारायचा प्रयत्न केला नाहीत ?.."त्याने विचारले.
"केला ना बराच प्रयत्न...पण ती काहीच प्रतिसाद देत नाहिये...शुन्यात बसुन असते बसं..."ती म्हणाली.
"बरं अजुन काही मदत लागली तर तुम्हाला नक्की विचारेन...पण मुक्ता मँडमला सांगु नका की आपण त्यांच्याविषयी काही चर्चा केलिये..."सांगुन त्याने तिला जाऊ दिले.
थोड्याच वेळात तिच्या पोलिस स्टेशनचा हवालदार माने,जो तिचा असिस्टंट आहे तो आला.
डाँक्टर ह्या नात्याने आपण का विचारत आहोत हे समजवुन सांगुन त्याने त्याला ही तोच प्रश्न विचारला.माने सांगु लागला,"डाँक्टरसाहेब...मँडम खुपच डँशिंग आहेत...पण आमच्या पोलिस स्टेशन मधे एका आरोपीने आत्महत्या केली तश्या त्याच जरा खचुन गेल्यात..."
"तुला काय माहिती त्या आरोपीविषयी ??"त्याने विचारले.
"मोठ्या आँफिसर लोकांना जास्त माहिती...आमच्या पोलिस स्टेशनला येऊन त्याला चारच दिवस झाले होते...खुप काही कळायच्या आतच त्याने आत्महत्या केली होती...मी नेमका त्या दिवशी ड्युटीवर नव्हतो...आल्यावर कळले सगळे..."
ह्यालाही जास्त काही माहिती नाही हे पाहुन पुन्हा लागल्यास तुम्हाला बोलावु पण तुम्ही इथे येऊन गेलात हे त्यांना सांगु नका हे सांगुन त्यालाही जाऊ दिले.
दोघांचे बोलणे आठवुन तो विचारात बसला होता तेवढ्यात डाँ.पुर्वा आली.
"सीआयडी सर...काही कळलं का??"तिने हसत विचारलं.
"काही विशेष नाही पण कुठेतरी सुरुवात करावी असे पाँईट्स कळाले आहेत...बघुयात...ह्याचा काही उपयोग होतोय का?"तो म्हणाला तशी पुर्वाने मान हलवली.
आज ह्या केसेससाठी एक तास वेगळा ठेवल्यामुळे पुढचे पेशंट वाट पहात आहेत हे माहिती असल्यामुळे तो कामाला लागला.
त्यानंतरची केस ही एका चाळीशीच्या बाईची होती व तिचा नवरा नेव्हीत असल्यामुळे तिला वेळ देऊ शकत नव्हता.मुलं आपल्या व्यापात बिझी असल्यामुळे तिला एकटेपणा आलेला होता.ही केस तर डाँ.पुर्वा पण चांगल्या रितीने हाताळेल ह्या विचाराने त्याने तु ह्या केसची सुरुवात तर कर,लागल्यास मी येतोच म्हणत पेशंट तिच्याकडे पाठवला.
मुक्ताला आजच्या सेशनला यायला सांगितले नव्हते पण त्याने तिच्या घरी फोन लावुन उद्याची वेळ द्यायला सांगितले.दहाच मिनिटात रिसेप्शन काऊंटरवरुन फोन आला की उद्या भेटण्यास पेशंट नकार देतो आहे.ओके म्हणत त्याने फोन ठेवला.हे उत्तर तसे त्याला अपेक्षितच होतेच.पण आता पुढे काय करता येईल ह्याचा तो विचार करु लागला....
-क्रमश:
© प्राजक्ता रुद्रवार

Comments
Post a Comment