त्या वळणावर - भाग 3

त्या वळणावर

भाग #3



दुसरयादिवशी मुक्ताला बोलावुन घ्यावे असा विचार केला पण अभिषेकला आठवलं की दोन दिवस काँन्फरन्स असल्यामुळे आपण काही करु शकत नाही.मग त्याने तो विषय सोडुन दोन दिवसात काँन्फरन्समधे येणारया विविध डाँक्टर्स बरोबर काय काय चर्चा करायची हे डायरीत नोंद करुन ठेवले. त्याचेही एक पेपर प्रेझेंटेशन असल्यामुळे त्याची उजळणी केली.सकाळी वेळ मिळणार नाही म्हणुन रात्रीच त्याची तयारी सुरु होती.तेवढ्यात फोन वाजला...इतक्या उशीरा कोण आहे म्हणुन बघितले तर डाँ.दिवाणांचा फोन होता.
त्याने फोन उचलला तर डाँ.बोलु लागले,"साँरी टु काँल यु लेट नाईट...पण एक गोष्ट सांगायला फोन केला...इन.मुक्ताचा मला काँल होता,तुझा नंबर मागण्यासाठी...म्हणे मला काही बोलायचं आहे डाँक्टरांशी...तर मी तुझा नंबर दिलाय...बघ काय सांगायचंय तिला ते..."
"नो प्रोब्लेम सर...तुमच्या रेफरन्सने आलेली केस आहे ही...नक्कीच साँभाळुन घेईन मी..."तो म्हणाला.,"पण एक विचारु का सर??ह्या केसमधे तुम्ही पर्सनली कसे काय गुंतले आहात?? एनी स्पेसिफिक रिझन??.."
"हो...ती काय सांगते हे तिच्या सिनियर्सना जाणुन घ्यायचे आहे...त्यांचा मला सारखा दबाव येतो आहे...म्हणुन मी तुला केस हँन्डओव्हर केलिये...काहीतरी गुंतागुंत असण्याची शक्यता आहे..."ते म्हणाले.अभिषेकने हो म्हणले व तो विचार बाजुला ठेवुन त्याने तयारी केली.
नंतरचे दोन दिवस बिझीच गेल्यामुळे इन.मुक्ता हा विषय त्याच्या डोक्यातही आला नाही.दुसरया दिवशी पेपर प्रेझेंटेशन नंतर डाँ.दिवाण दिसल्यावर त्याला मुक्ताच्या केसची आठवण आली.पण दोन तिचा काहीच फोन आला नाही म्हणुन त्यावर दोघांचे विशेष असे काही संभाषण झाले नाही.
काँन्फरन्स संपवुन घरी यायला रात्रीचे नऊ वाजले.जरा फ्रेश होऊन तो टेरेसवर आला.आकाशातल्या चांदण्याशी सलगी वाटावी म्हणुन तो डोळे मिटुन रिलँक्स चेअर वर पहुडला व त्याला आठवले की दिवसभर फोनकडे बघायला वेळ मिळाला नाही म्हणुन फोन,मेसेजेस त्याने बघितलेच नव्हते.स्क्रोल करताना त्याला नवीन नंबरवरुन मेसेज दिसला.मुक्ताचा होता..."माहित नाही...तुमचा विश्वास वाटतोय म्हणुन तुमच्याशी काही बोलावंस वाटतंय...पण हा विश्वास खरा राहिलं का?"
तिच्या ह्या धडक लिहिण्याची त्याला गंमत वाटली आणि वाटले की इतकी धडक असेल तर का म्हणुन अशी गप्प झाली असेल ती अशी?...बघितले तर साधारण दोन तासापुर्वीचा मेसेज होता.त्यानेही सरळ रिप्लाय दिला,"विश्वासावरच दुनिया कायम आहे असं म्हणतात...तेच पुढे चालवुयात..."
इकडे डाँ.अभिषेकला बघितल्यापासुन हा माणुस विश्वासातला आहे असे तिला वाटतं होते.पण तरीही बोलायची इच्छा होत नव्हती.हा मुकेपणा नसुन तोंड गप्प करणे आहे हा फरक कळत असुनही काही बोलावेसे वाटत नाही हे विशेष आहे हे तिला कळत होते.डाँक्टरांचा मेसेज वाचुन ती विचारात पडली.
खर आहे अभिषेक म्हणत आहे ते म्हणुन उद्या भेटायचे ठरवुन
ती झोपली.
आपला मेसेज वाचुन मुक्ता स्वत:हुन भेटायला तयार झाली हे पाहुन अभिषेकला बरं वाटलं.पण तिला हाँस्पिटलमधे न भेटता कुठेतरी एकट्यात भेटायचे आहे हे बघुन मात्र तो विचारात पडला.तिची मनस्थिती पहाता एखाद्या रेस्टाँरंट किंवा कँफेत बसावे असे त्याला वाटले.
ठरल्याप्रमाणे ती रिक्षा करुन कँफेमधे आली.ह्या कँफेविषयी व एरियाविषयी माहिती असल्यामुळे तिला ठिक वाटले.अभिषेक आधीच येऊन बसला होता.रिक्षातुन तिला उतरताना तिची बाँडी लँग्वेज पाहुन अंदाज बांधायचा त्याने असफल प्रयत्न केला.हातातल्या मोठ्या पर्सला काखेत घट्ट दाबुन ठेवत ती तो कुठे आहे हे बघु लागली.अभिषेकने तिच्याकडे बघुन हात उंचावला तशी ती त्याच्या दिशेने आली.आज ती जरा चांगली तयार झालेली दिसत होती,पण बहुदा आज पहिल्यांदाच तिने डोळ्यात डोळे घालुन बघितले म्हणुन वाटतं असेल,असे त्याला वाटले.
"हाय...साँरी ...लेट झाला का?.." तिने विचारले.
"नाही..मीच जरा लवकर येऊन बसलोय निवांत..."तो म्हणाला.
पुढचे काही क्षण तसेच गेले...
शेवटी अभिषेकने तिला विचारले,"काय घेणार??"
"तुम्ही घेणार असालं तर काँफी चालेल..."ती म्हणाली.
दोन काँफी आँर्डर करुन त्याने तिच्याकडे पाहिले.ती दोन्ही हात एकमेकांमधे गुंफुन बोटांचा चाळा करत होती.त्यावरुन तिची अस्वस्थता दिसुन येत होती.अभिषेकच्या डाँक्टरी नजरेतुन ही गोष्ट सुटली नाही.
तो लगेच म्हणाला,"रिलँक्स...तु कम्फर्टेबल हो आधी...मग सांग..."
तिने त्याच्या डोळ्यात पाहिले.त्याने डोळ्यांनीच रिलँक्स असे खुणावले.
तिच्या मैत्रिणीने दिलेल्या माहितीच्या आधारावर तिला क्ल्यु द्यावा तसे तो म्हणाला,"मोठ्या कष्टाने स्वत:चे लहानपणापासुनचे स्वप्न पुर्ण केलेस तु..."
ती बोलु लागली,"हो...लहानपणी सुध्दा मला विचारले की तुला काय बनायचे की तर इतर मुलींसारखे टिचर,डाँक्टर न म्हणता मी पोलिसच म्हणत असे.माझे वडिल पण ह्याच पेशात होते.पण मी पाच वर्षांची होते तेव्हाच ते वारले..."हे सांगताना तिचा आवाज भरुन आला होता.
ती पुढे बोलु लागली,"पण आईनेच मला बाबांच्या माघारी मोठं केलं.आई लग्नाआधीपासुनच नोकरी करत होती.तिच्या आधारावरच हे शक्य झालं...हळुहळु माझे पोलिस व्हायचे ध्येय पक्के होत होते.खरं तर मी पोलिसदलात जावे हे आईला अजिबात नको वाटत होते.पण माझ्या जिद्दीपुढे तिने हार मानली.खुप मेहेनत करुन मी पोलिसदलात रुजु झाले."
ती क्षणभर बोलायची थांबली.स्वत:च्या हाताकडे बघत ती अस्वस्थ होती.
त्याने विषय बदलला."तुला दुसरा कुठला छंद नाहिये का?"
ती विचारात पडली...हलके हसत म्हणाली,"छंद पाळायला वेळच नसे माझ्याकडे...सतत मेहेनत करावी लागत असे...त्यातल्या त्यात वेळ मिळेल तेव्हा लिहित असे...पण हेही आज तुम्ही विचारल्यावर आठवलं की ह्याला छंद म्हणता येईल म्हणुन..."
तो फक्त हसला."म्हणजे एकुनच निरसं जीवन जगलीस म्हण ना..."असे त्याने तिला म्हणताच ती लगेच म्हणाली,"नाही हा...असे नाही म्हणता येणार...हा माझ्या आवडीचा मनासारखा जाँब असल्यामुळे मी खुप एन्जाँय करत होते.कधीच वाटलं नव्हतं की आपण चुकीच प्रोफेशन सिलेक्ट केलयं...नाशिकवरुन मुंबईला येईपर्यंत...म्हणजे मी मुंबईतच शिकले...पण माझी पहिली पोस्टिंग नाशिकला झाली.तिथे बाकीचे लोकंही खुप चांगले मिळाले होते..."
असे म्हणत ती बोलायची थांबली..तिची कंटिन्युटी सुरु ठेवावी म्हणुन तो म्हणाला,"म्हणजे कोणी स्पेशल आलं होतं का तिथल्या वास्तव्यात??.."
त्याचा रोख समजुन ती हसली,तेवढ्यात वेटर काँफीचा ट्रे घेऊन आला.आणि ती गप्प बसली.तोही गप्प होऊन तिच्याकडे एकटक पहात होता.तिने काँफीचा कप त्याच्या पुढे ठेवला व दुसरा कप स्वत:समोर ठेवला.चिमट्याने साखरेचा क्युब कपात टाकताना काँफीला तरंग निर्माण झाला असे त्याला वाटले.ती मात्र कपाकडे एकटक बघत मिनी स्ट्राँने काँफी हलवतं होती.
त्याने पुन्हा तिला तोच प्रश्न विचारला,"कोणी खास होत का नाशिकच्या वास्तव्यात?.."
तिने त्याच्याकडे बघितले व ती बोलु लागली...

-क्रमश:

© प्राजक्ता रुद्रवार






Comments

Popular posts from this blog

त्या वळणावर - भाग 8

त्या वळणावर - भाग #1